देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे राजभवनावर, आजच होणार शपथविधी!

WhatsApp Group

मुंबई – बुधवारी सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, यानंतर राज्यातल्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे थोड्याच वेळात राजभवनमध्ये जाऊन राज्यपालांची (Governor Bhagatsingh Koshyari) भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये दोन्ही नेते राज्यपालांना त्यांच्याकडे असलेल्या आमदारांच्या सहीचं पत्र देतील.

सत्तास्थापनेचे पत्र दिल्यानंतर राज्यपाल फडणवीस आणि शिंदे यांना शपथविधीसाठी बोलावतील. हा शपथविधी आजच संध्याकाळी 7 वाजता होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी सोहळा होईल. आज महत्त्वाच्या नेत्यांचाच शपथविधी होणार आहे, त्यानंतर राज्यपाल विशेष अधिवेशन बोलावतील. या अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.