देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, ट्वीट करत दिली माहिती!

WhatsApp Group

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. मला करोनाची लागण झाली असून मी गृह विलगीकरणात असल्याचं त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यात राजकीय नेतेमंडळींनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर येऊ लागलं आहे.