‘इतकी ‘बालबुद्धी’ तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे समजणारही नाही, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ईडीकडून मुंबई महापालिकेकडून कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी सुरु असलेल्या कारवाईवरुनही भाजपवर सडकून टीका केली. त्यांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला फेसबुकद्वारे प्रत्युत्तर देली आहे. पाहूया फडणवीसांची ही फेसबुक पोस्ट
“मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे !
ज्या ‘व्हॉटसअॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत, कारण, लपविण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका.
चिंता करायचीच असेल आणि पुस्तक काढायचेच असेल तर यावर काढा





तुमचे हिंदूत्त्व आणि तुमचे कारनामे आता एकेक करीत जनतेत उघड होतच आहेत आणि होतच राहणार
आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही.
तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे समजणार देखील नाही. (नड्डे म्हणजे घसा)
तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या…
बघूच आता शवासन कुणाला करावे लागते ते…”