जाणून घेऊयात IPL मध्ये सर्वात जलद १००० धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंबद्दल, तेंडुलकर आजही अव्वल

WhatsApp Group

आयपीएलच्या १५ IPL 2022 हंगामातील तिसाव्या सामन्यात राजस्थानचा फलंदाज देवदत्त पडीक्कलने Devdutt Padikkal एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ब्रेबॉर्न स्टेडियमवर १८ एप्रिलला खेळण्यात आलेल्या सामन्यात देवदत्त पडीक्कलने २४ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने IPL मध्ये १ हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला.

यासह देवदत्त पडीक्कलने आयपीएलमध्ये सर्वात जलद १ हजार धावा 1,000 runs in IPL करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. पडीक्कलने ३५ डावांमध्ये १ हजार धावा पूर्ण केल्या. या यादीत पहिल्या स्थानावार सचिन तेंडुलकर Sachin Tendulkar असून त्याने ३१ डावात आयपीएलमध्ये १ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. तर सुरेश रैना ३४ डावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

आयपीएलमध्ये सर्वात कमी डावात १ हजार करणारे फलंदाज

सचिन तेंडुलकर – ३१ डाव
सुरेश रैना – ३४ डाव
देवदत्त पडीक्कल – ३५ डाव
रिषभ पंत – ३५ डाव
रोहित शर्मा – ३७ डाव