Morocco Earthquake: मोरोक्कोमध्ये विध्वंसक भूकंप! आतापर्यंत 2000 हून अधिक लोकांचा मृत्यू

0
WhatsApp Group

आफ्रिकन देश मोरोक्को येथे शुक्रवारी रात्री झालेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या 2000 च्या पुढे गेली आहे. मोरक्कनच्या गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. यासोबतच या भूकंपात दोन हजारांहून अधिक लोक जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. गृह मंत्रालयाच्या निवेदनानुसार, शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या भूकंपात 2012 लोकांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. तर 2059 जण जखमी झाले आहेत. यापैकी 1404 जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.

भूकंपानंतर बचावकार्य सातत्याने सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. अजूनही अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढिगाऱ्यातून अनेकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या भूकंपातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या विनाशकारी भूकंपानंतर देशात तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. बाधित भागात शुद्ध पिण्याचे पाणी, अन्नपुरवठा, तंबू आणि ब्लँकेट पुरवण्यासाठी सशस्त्र दल बचाव पथके तैनात करण्यात येतील, असेही सांगण्यात आले आहे.