Viral Video: देसी जुगाड! चोरांपासून दागिने वाचवण्यासाठी महिलेने लावली डोकॅलिटी; आयडिया पाहून नेटकरी म्हणाले, “चोरांचं काम सोपं केलंत!”

WhatsApp Group

आपल्याकडे ‘जुगाड’ या शब्दाला एक वेगळंच महत्त्व आहे. भारतीयांकडे प्रत्येक समस्येवर असं काही अजब तोडगा असतो की जग पाहतच राहतं. पण कधीकधी हेच जुगाड अंगाशी येतात. सध्या एका महिलेचा असाच एक ‘सेफ्टी हॅक’ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या महिलेला वाटलं की तिने चोरांना चकवण्यासाठी जगातील सर्वात सुरक्षित पद्धत शोधली आहे, पण नेटकऱ्यांच्या मते तिने चोरांचं काम आणखी सोपं करून ठेवलं आहे.

टी-शर्टच्या मागे लपवले दागिने

इन्स्टाग्रामवर @shiprarai2000 नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये ही महिला घराबाहेर जाताना आपले दागिने, पैसे, महागडी घड्याळं आणि घराची चावी कशी सुरक्षित ठेवावी, हे सांगताना दिसते. तिने सर्वात आधी हे सर्व मौल्यवान सामान एका प्लास्टिक पिशवीत भरलं. त्यानंतर ती पिशवी कपडे अडकवण्याच्या एका हँगरला मधोमध बांधली. चोरांना संशय येऊ नये म्हणून तिने त्या हँगरवर एक टी-शर्ट चढवला, जेणेकरून दागिन्यांची पिशवी आत लपली जाईल. शेवटी, तिने तो टी-शर्ट भिंतीवरच्या एका साध्या खुंटीला टांगून दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shipra Rai (@shiprarai2000)

नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

व्हिडिओच्या शेवटी ही महिला अत्यंत अभिमानाने ‘थम्स अप’ करते, जणू काही तिने घरात एक अदृश्य तिजोरीच तयार केली आहे. व्हिडिओवर ‘काश! हे आधी माहीत असतं’ असंही लिहिलं आहे. मात्र, ही आयडिया पाहून लोक डोक्याला हात लावून घेत आहेत. नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही ही ट्रिक जगाला ओरडून सांगत असाल, तर चोर सर्वात आधी तुमच्या भिंतीवरचे कपडेच तपासेल. अशा प्रकारे स्वतःची गुपितं सार्वजनिक केल्यामुळे सुरक्षेचा प्रश्नच उरलेला नाही, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

मजेशीर कमेंट्सचा पाऊस

एका युजरने टोला लगावत लिहिले, “आता चोर कपाट सोडून आधी भिंतीवरचा टी-शर्ट चेक करेल.” दुसऱ्याने म्हटले, “ताई, तुम्ही तर चोरांना ट्रेनिंग दिलीत, आता ते तुम्हाला थँक्यू म्हणतील.” तर एकाने मिश्किल टिप्पणी केली की, “तुमची ही ‘डोकॅलिटी’ पाहून चोरांनी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असेल.” थोडक्यात काय, तर या महिलेचा ‘सेफ्टी हॅक’ पूर्णपणे बॅकफायर झाला असून इंटरनेटवर तिची चांगलीच फजिती उडाली आहे.