Devendra Fadnavis on Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे हिंदुत्ववादी आहेत.. त्यांच्या वक्तव्याचा कधी कधी वेगळा अर्थ निघतो, नारायण राणे आणि मी त्यांच्याशी चर्चा केली असून त्यांना वादग्रस्त वक्तव्य टाळण्याचा सल्ला दिला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे यांच्या विशिष्ट धर्माच्या विरोधी वक्तव्यामुळे चर्चेत आहे. विविध संघटनांनी नितेश राणे यांचा निषेधही केला आहे. बुलढाणाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नितेश राणे यांचे याबाबत कान टोचले.
यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, ते म्हणाले, नितेश राणे यांच्याशी त्याचेवडील नारायण राणे आणि मी सुद्धा बोललेलो आहे. त्यांना असे वक्तव्य टाळण्याचा सल्ला दिला आहे. यापुढे ते काळजी घेतील.