मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येने संपूर्ण देश हादरला आहे. मात्र, या प्रकरणाचा अद्याप तपास सुरू आहे. अभिनेता 14 जून 2020 रोजी त्याच्या मुंबईतील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचे चाहते या अभिनेत्याला न्याय देण्याची मागणी सातत्याने करत आहेत. अभिनेत्याच्या आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वी त्याची व्यवस्थापक दिशा सालियन हिचाही मृत्यू झाला होता. या घटनेला तीन वर्षांनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही प्रकरणांबाबत मोठा अपडेट शेअर केला आहे.
एका मुलाखतीदरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यूप्रकरणी ठळकपणे पुरावे गोळा केले जात आहे. सर्व पुरावे जमा होताच आम्ही हे प्रकरण पुन्हा पुढे नेऊ.
उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘या प्रकरणात आमच्याकडे सर्व पुरावे आहेत, असे काही लोक म्हणाले, तेव्हा आम्ही पुरावे सादर करा, आम्ही तुमच्या पुराव्यातील तथ्य तपासू. पुरावे बरोबर असतील तर पुढे जाऊ. ज्यांनी काहीही दावा केला आहे अशा लोकांना आम्ही बोलावले आहे. त्यांची चौकशी केली जात आहे. काही पुरावे नोंदवले गेले आहेत. अशा परिस्थितीत निकालांवर भाष्य करणे घाईचे आहे. सोशल मीडियावरही याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.