
मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar corona) कोरोनाबाधित झाले आहेत. त्यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. असं ट्वीट अजित पवार यांनी केलं आहे.
काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 27, 2022
राज्यात राजकीय नेत्यांना कोरोना होण्याची मालिका सुरूच आहे. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनाही कोरोनाची लागण झाली होती. आता त्यामध्ये अजित पवार यांच्या नावाची भर पडली आहे.