
Ashadhi Wari 2022: बुलडाणा जिल्हयातील शेगाव येथून संत गजानन महाराजांच्या पालखीचं आषाढी वारीकरता पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. आज सकाळी 7 वाजता शेगाव येथील श्री संत गजानन महारांजाच्या मंदिरातून पालखीचे प्रस्थान झाले. त्यानंतर ही पालखी दुपारी ‘श्री क्षेत्र नागझरी’ येथे आगमन व पारस येथे मुक्काम करणार आहे. तर दुसऱ्या दिवशी 7 जून रोजी अकोल्यामधील गायगांव येथे आगमन व भौरद येथे मुक्काम करणार आहे.
#बुलडाणा जिल्हयातील #शेगाव इथून संत गजानन महाराजांच्या पालखीचं आषाढी वारीकरता पंढरपूरकडे प्रस्थान. @DDNewslive @DDNewsHindi #Maharashtra pic.twitter.com/evlr90Kqbw
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) June 6, 2022