माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या कबरीवर तिरंगा फडकावणाऱ्या आणि ‘अमर रहे’च्या घोषणा देणाऱ्या काँग्रेस नगरसेवक उमेदवाराविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस नेत्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 153बी आणि राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा 1971च्या कलम 2 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 100 हून अधिक गंभीर गुन्हेगारी प्रकरणात नामांकित आणि माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा माफिया भाऊ अशरफ यांची गेल्या आठवड्यात प्रयागराजमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
याप्रकरणी काँग्रेस नेत्याविरोधात प्रयागराजच्या धुमनगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. राजरूपपूर चौकीचे प्रभारी विवेक कुमार सिंह यांनी गुन्हा दाखल केला आहे. यानंतर काँग्रेसचे नगरसेवक पदाचे उमेदवार राजकुमार सिंह उर्फ रज्जू भैया यांनाही अटक करण्यात आली आहे. काँग्रेसचे राजकुमार उर्फ रज्जू भैया हे प्रयागराजमधील महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 43 दक्षिण मलाका येथून नगरसेवक आहेत. काल राजकुमारने अतिक आणि अश्रफ यांच्या कबरीवर तिरंगा फडकवलाच पण ‘अतीक अहमद अमर रहे’चा नाराही दिला.
After presenting the Tricolour at the grave of gangster Atiq Ahmed, a Congress candidate from Uttar Pradesh requests the Bharat Ratna and “Shaheed status” for him.
Will @Uppolice take action for insulting Tricolor? pic.twitter.com/OCZSDAoTte
— ADV. ASHUTOSH J. DUBEY 🇮🇳 (@AdvAshutoshBJP) April 19, 2023
इतकेच नाही तर काँग्रेस नेत्याने अतिक आणि अश्रफ यांना शहीद म्हणत त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली. अतिक अहमद यांना भारतरत्न देण्याची मागणीही करण्यात आली. दुसरीकडे, काँग्रेस पक्षाने हे वक्तव्य करणाऱ्या युट्युबरविरोधात सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नगरसेवक उमेदवार राजकुमार यांची फसवणूक करून हे वक्तव्य केल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. अटक करण्यात आलेल्या काँग्रेस नेत्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. जामीन न मिळाल्यास त्याची रवानगी तुरुंगात होणार आहे. दोन्ही कलमांत ३ वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद असली तरी, त्यामुळे न्यायालयातून अर्ज केल्यावर जामीन मिळू शकतो.