गरोदर महिलांना कामावर न घेणाऱ्या SBI ला महिला आयोगाची नोटीस!

WhatsApp Group

नवी दिल्ली – गरोदर महिलांना अनफिट ठरवणाऱ्या State Bank of India ला दिल्ली महिला आयोगाकडून (Delhi Commission for Women) नोटीस पाठवून उत्तर मागण्यात आले आहे. एसबीआय व्यवस्थापनाने गरोदर महिलांना कामावर येण्यासाठी नियमात बदल केले आहेत.

याआधी 6 महिने गरोदर असताना महिलांना कामावर रुजू करायचे. पण आता 3 महिन्यांच्यावर जर महिला कर्मचारी गरोदर असेल तर त्या महिलेल्या कामावर घेतले जाणार नाही. तर त्यांना ‘टेम्पररी अनफीट’ मानले जाणार आहे तर डिलिव्हरीच्या 4 महिन्यांनंतर त्या महिलांनी कामावर आले पाहिजे अशी तरतूद करण्यात आली आहे.

ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज युनियनकडून एसबीआयला नोटिस पाठवत हा निर्णय मागे घ्यावा असे सांगण्यात आले आहे. हा निर्णय मागे न घेतल्यास कायदेशीर लढाई लढू असंही सांगण्यात आले आहे.