DC Vs SRH: घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सचा सनरायझर्स हैदराबादकडून पराभव

0
WhatsApp Group

DC Vs SRH: अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात हाय व्होल्टेज आणि हाय स्कोअरिंग सामना खेळला गेला. या सामन्यात ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करताना हैदराबादने ज्या पद्धतीने सुरुवात केली त्यामुळे दिल्लीला धक्का बसला. पॉवर प्लेमध्ये 125 धावा करणाऱ्या हैदराबाद संघाने दिल्लीला 267 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात दिल्लीला पूर्ण 20 षटकेही फलंदाजी करता आली नाही आणि दिल्लीचा संघ 199 धावांत सर्वबाद झाला. हैदराबादने हा सामना 67 धावांनी जिंकला.

सनरायझर्स हैदराबादने दिलेल्या 267 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाला 20 षटकेही खेळता आली नाहीत आणि घरच्या मैदानवार 19.1 षटकांत 199 धावांपर्यंत मजल मारली. दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या 2 विकेट फक्त 2 षटकात पडल्या. डेव्हिड वॉर्नर 1 आणि पृथ्वी शॉ 16 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. मात्र, जेक फ्रेझर-मॅकगर्क आणि अभिषेक पोरेल यांनी दिल्लीसाठी पुनरागमन केले, पण त्यानंतर मयंक मार्कंडेने जेकला 65 धावांवर बाद केले. जेक अवघ्या 18 चेंडूंत 5 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 65 धावांवर बाद झाला.

त्याचवेळी अभिषेकही मयंकचा बळी ठरला आणि 22 चेंडूंत 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 42 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. ट्रिस्टन स्टब्स 10(11), ललित यादव 7(8), अक्षर पटेल 6(8) धावांवर बाद झाले. ऋषभ पंत 35 चेंडूंत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 44 धावा करून बाद झाला. एनरिक नोर्टजे आणि कुलदीप यादव शून्यावर बाद झाले. अशाप्रकारे दिल्लीचा संघ 19.1 षटकांत 199 धावांवरच मर्यादित राहिला. सनरायझर्स हैदराबादने हा सामना 67 धावांनी जिंकला. या विजयासह त्याने पॉइंट टेबलवर झेप घेतली आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील हैदराबादने 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत आणि 10 गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान गाठले आहे.

दिल्लीविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 131 धावांची भागीदारी केली. पॉवर प्ले संपल्यानंतर अभिषेक 46(12) च्या स्कोअरवर बाद झाला. यानंतर एडन मार्कराम 1 धावा काढून बाद झाला. ट्रॅव्हिस हेड 89 धावांवर बाद झाला. हेड 32 चेंडूत 89 धावांवर बाद झाला. यादरम्यान त्याने 11 चौकार आणि 6 षटकारही मारले. तर अभिषेकने 12 चेंडूत 2 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 46 धावांची खेळी केली.

हेनरिक क्लासेन 15(8), नितीश रेड्डी 37(27), अब्दुल समद 13(8) आणि पॅट कमिन्स 1 धावांवर बाद झाले. शाहबाज अहमदनेही अप्रतिम फलंदाजी करत 29 चेंडूंत 2 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 59 धावा करून नाबाद परतला.