आयपीएल २०२४ (IPL) चा ६४ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स (DC vs LSG) यांच्यात अरुण जेटली स्टेडीयमवर खेळला गेला. लखनौचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने ४ गडी गमावून २०८ धावा केल्या होत्या. प्रत्युतरात लखनऊचा संघ १८९ धावाच करु शकला. दिल्लीने १९ धावांनी हा सामना जिंकला आहे.
प्रथम फलंदाजी करताना दिल्लीकडून अभिषेक पोरलने सर्वाधिक ५८ धावांची तर ट्रीस्टन स्टब्सने ५७ धावांची खेळी खेळीली. शाई होपने ३८ तर कर्णधार पंतने ३३ धावांचे योगदान दिले. लखनऊकडून गोलंदाजी करताना नवीन-उल-हकने सर्वाधिक २ गडी बाद केले. तर अर्शद खान आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
Ishant Sharma stars as Delhi Capitals end their league stage with a win over LSG – both sides are effectively out of playoff contention with negative NRRs #DCvLSG #IPL2024
👉 https://t.co/CNBuvIoKqj pic.twitter.com/IbhfswkP58
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 14, 2024
दोन्ही संघ
लखनौ सुपर जायंट्स: केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, कृणाल पंड्या, युधवीर सिंग चरक, अर्शद खान, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान.
दिल्ली कॅपिटल्स: अभिषेक पोरेल, जेक फ्रेझर-मॅकगर्क, शाई होप, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, गुलबदिन नायब, रसिक दार सलाम, मुकेश कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद.