पदवी परीक्षांचा निकालांच्या छापील गुणपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात दिरंगाई; मनविसेचा आंदोलनाचा इशारा

WhatsApp Group

प्रथम ते तृतीय वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाचे निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आले. ऑनलाईन निकाल जाहीर केल्यानंतर तातडीने छापील गुणपत्रिका सुद्धा वितरित करण्यात येतात; परंतु पुणे विद्यापीठाकडून आजपर्यंत ह्या छापील स्वरूपातील गुणपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या नाहीत. याबाबत पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ४८ तासांत खुलासा करावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना या मागणीसाठी तीव्र आंदोलन करेन. असा इशारा देण्यात आला आहे.

मनविसेच्या पत्रानुसार भविष्यातील प्रवेश, शिष्यवृत्ती, परदेशी शिक्षण प्रवेश, शैक्षणिक कर्ज अश्या अनेक कारणांसाठी गुणपत्रिकेच्या प्रती अत्यावश्यक असतात. असे असूनही आपल्या विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे . याहीपेक्षा गंभीर म्हणजे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे या गुणपत्रिका अजुन छापलेल्या च नसलेबाबत माहिती मिळाली आहे. सदर बाब अत्यंत गंभीर आहे. याप्रकरणी आपण त्वरित लक्ष घालून छापील गुणपत्रिका वितरणाबाबत , सद्यस्थिती आणि निश्चित तारीखे बाबत ४८ तासांत खुलासा करावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना या मागणीसाठी तीव्र आंदोलन करेल. असे ही पत्रात म्हटले आहे.