बंगळुरू – दबंग दिल्लीने Dabang Delhi प्रो कबड्डी लीगच्या PKL आठव्या हंगामाचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात दिल्लीने पटणा पायरेट्सचा Patna Pirates 37-36 असा पराभव केला. दिल्लीने प्रथमच प्रो कबड्डी लीगची ट्रॉफी जिंकली आहे. तर पटणा पायरेट्सचे चौथ्यांदा विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले.
दबंग दिल्लीच्या विजयाचे नायक ठरले ते नवीन कुमार Naveen Kumar आणि विजय मलिक Vijay Malik होते. विजयने 14 आणि नवीनने 13 गुण आपल्या नावावर केले. पटनातर्फे सचिन तन्वरने 10 आणि गुमान सिंगने नऊ गुण आपल्या नावावर केले.
And we have our first time C.H.A.M.P.I.O.N.S. of #VIVOProKabaddi ????
???????????????????????? ???????????????????? ???????????????????????????? ???????????????? – ???????????????????????????????? ???????????? ????????????????! ????#PATvDEL #SuperhitPanga #VIVOProKabaddi @DabangDelhiKC @PatnaPirates pic.twitter.com/H9C3sd96Te
— ProKabaddi (@ProKabaddi) February 25, 2022
बेंगळुरू बुल्सच्या पवन शेरावतने 24 सामन्यांत 324 रेड पॉइंट्स केले. त्याला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रेडर म्हणून गौरविण्यात आले. पाटणा पायरेट्सचा बचावपटू मोहम्मद रजा याला सर्वोत्कृष्ट बचावपटूचा किताब मिळाला. पुणेरी पलटणच्या मोहित गोयतला यंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा किताब मिळाला. दबंग दिल्लीचा नवीन कुमार हा स्पर्धेतील सर्वात मौल्यवान खेळाडू ठरला.