Good News! दीपिका-रणवीर लवकरच होणार आई-बाबा; ‘या’ महिन्यात देणार बाळाला जन्म

WhatsApp Group

Deepika Padukone-Ranveer Singh: अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह हे आई-बाबा होणार आहेत. याची खास पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दिपिकाच्या प्रेग्नसीच्या चर्चा सुरु होत्या. दीपिका आणि रणवीर यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.

दीपिका आणि रणवीर यांनी खास पोस्ट शेअर करत ‘सप्टेंबर 2024’ असं लिहिलं आहे. ही पोस्ट शेअर केल्यानंतर आता कलाकार आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. काही दिवसांआधीच एका अवॉर्डला दिपिका उपस्थित राहिली होती. त्यावेळी ती तिचा बेबी बंप लपवताना दिसली असं म्हटलं जात होतं. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

अभिनेत्री दीपिका पदुकोण नुकतीच 77 व्या बाफ्टा अवॉर्ड्समध्ये सहभागी झाली होती, तेव्हा लोकांनी अंदाज लावला होता की ही अभिनेत्री आई होणार आहे. या इव्हेंटमधील दीपिकाचा लूक पाहून चाहत्यांना अंदाज आला होता की दीपिका आई होणार आहे. त्यावेळी दीपिका किंवा रणवीर दोघांनीही यावर प्रतिक्रिया दिली नव्हती, पण आता या जोडप्यानेच ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे आणि चाहतेही खूप खूश आहेत. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी 14 नोव्हेंबर 2018 रोजी इटलीमध्ये लग्न केले होते. आता लग्नाच्या 6 वर्षानंतर या जोडप्याने आनंदाची बातमी दिली आहे.