
मुंबई – शिवसेना (Shivsena) नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केली आहे. शिवसेनेच्या विरोधात जात त्यांनी आमदारांना सोबत घेऊन महाविकास आघाडी सरकारला वेठीस धरले आहे. या सर्व आमदारांसह एकनाथ शिंदे हे आसामची राजधानी गुवाहटी येथे गेले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याचे समजताच राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसेनेशी गद्दारी करू नका असे आवाहन शिवसैनिकांकडून करताना दिसून येत आहे. अशातच शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी देखील एक ट्विट केलं आहे.
देवा लवकर आटप रे हे सगळं, हॅाटेल चे बिल वाढतोय, विरोधकांचा भाव वाढतोय, ED ची नोटीस लाव वाढतोय, शिवसैनिकांच्या मनातील घाव वाढतोय, आमदारांचा ताव वाढतोय, विधिमंडळातील डाव वाढतोय, लवकरात लवकर महाराष्ट्राच्या जनतेला चांगले दिवस दाखव रे महाराजा! होय महाराजा! असं ट्वीट दीपाली सय्यद यांनी केलं आहे.