घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने पाहिला, दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला

WhatsApp Group

मुंबई – मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज पुण्यात सभा पार पडली. यावेळी त्यांनी एक पत्र लिहून देणार असून ते घराघरात पोहोचवण्याचं आवाहन मनसैनिकांना केलं. तसेच हे एक आंदोलनच असल्याचंही त्यांनी म्हटलं. यावरून शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

“पत्रक घरोघरी दिल्यानंतर तुम्ही आदोंलन करून जेलमध्ये जाणार आणि अमित ठाकरे लपून बसणार, हा शिलेदारांसाठी मोठा ट्रॅप आहे. घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने पाहिला,” असं म्हणत दीपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.