”ज्यांचे राजकारण दोन तालुक्यांचे ते…”, दिपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला

WhatsApp Group

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसे मेळाव्यामध्ये मशिंदीवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं. राज ठाकरे यांच्यावर शिवसेनेसह विरोधकांनी टीकेची झोड उठवली. हिंदुत्वाचा (Hinduism) मुद्दा केंद्रस्थानी ठेवून राज ठाकरे यांची सेना आता ५ जूनला अयोध्येला जाणार आहे.

यावरुन राजकीय चर्चांणा उधाण आळे असून शिवसेनेने राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर सवालही उपस्थित केले आहे. दरम्यान अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी राज ठाकरेंवर ट्वीट करत टीका केली आहे.

ज्यांचे राजकारण दोन तालुक्यांचे ते शिवसेनेला नोटाचे राजकारण काय शिकवणार ? जर भिती वाटत असेल तर अयोध्येत शिवसेनेचा (Shivsena) धाक आजही कायम आहे. असं ट्विट करत दिपाली यांनी राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

दिपाली सय्यद यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ज्यांचे राजकारण दोन तालुक्यांचे ते शिवसेनेला नोटा चे राजकारण काय शिकवणार, जर भिती वाटत असेल तर अयोध्येत शिवसेनेचा धाक आजही कायम आहे. आदित्य साहेबांना विनंती करून सोबत येऊ शकता,माफी मागण्याची गरज लागणार नाही. जय श्रीराम. असं ट्वीट दिपाली सय्यद यांनी केलं आहे.