सर्कशीतील माकडांना सुद्धा लाजवाल असा कारभार चाललाय तुमचा – दीपाली सय्यद

WhatsApp Group

मुंबई – खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी अमरावतीच्या रामनगर येथील मंदिरात हनुमान चालीसा पठण केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली होती. ‘उद्धव ठाकरे राज्यात शनी म्हणून बसले आहेत, या शनीची पीडा दूर व्हावी म्हणून आम्ही हनुमान चालीसा पठण करत आहोत.’, असे वक्तव्य राणा यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकीय वातावरण तापलं असून शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Deepali Sayed) यांनीही नवनीत राणांवर जोरदार निशाणा साधला आहे.

राणाबाई शनी मागे लागल्यावर मानसिक स्थिती ढासळते, तुम्हाला तपासणीची गरज आहे. जरा अमरावतीकरांकडे लक्ष द्या, नाहीतर निवडणुकीत हा शनी तुमच्यावर भारी पडेल. सर्कशीतील माकडांना सुद्धा लाजवाल असा कारभार चाललाय तुमचा, असे ट्विट करत दिपाली सय्यद यांनी राणा यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

अमरावतीचे खासदार नवनीत राणा (Navneet Rana)आणि पती रवी राणा दिल्लीवारी करुन आज नागपूरमध्ये पोहोचले. त्यानंतर राण दाम्पत्याने रामनगर येथील मंदिरामध्ये हनुमान चालीसा आणि आरतीचे पठण केले. यावेळी माध्यमांशी बोलताना नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. दरम्यान, राणा दाम्पत्याने नागपूर येथील रामनगर येथील मंदिरात हनुमान चालीसा आणि आरतीचे पठण केले. आजच राष्ट्रवादी काँग्रेसनेही (NCP)त्याच ठिकाणी हनुमान चालीसाचे पठण केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे महागाई विरोधात आज आंदोलन होते. दोन्ही चालीसा पठणाला आज पोलिसांकडून परवानगी देण्यात आली होती.