आग लावण्याचा प्रयत्न केलात तर… दीपाली सय्यद यांचा देवेंद्र फडणवीसांना इशारा

WhatsApp Group

मुंबई – ‘सूर्याकडे पाहून थुंकलं तर ती थुंकी स्वत:च्या तोंडावर पडते, त्यांनी सुर्याकडे पाहून थुंकण्याचा प्रकार केला आहे. त्यामुळे थुंकी त्यांच्याच तोंडावर पडेल.’अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांच्यावर नुकतीच केली होती.

त्यानंतर आता दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी पलटवार करत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. फडणवीस साहेब तुमच्या मनातील सूर्यापेक्षा (sun) हा आमचा संयुक्त महाराष्ट्र खूप मोठा आहे. त्यात आग लावण्याचा प्रयत्न केलात तर तुमच्या मनातील सूर्याला सुद्धा आम्ही भीक घालणार नाही. सूर्यावर कसे थुंकतात याचे धडे आम्हाला श्रीलंकेकडून घेण्याची गरज नाही. शिवसेना अंगार आहे, असा घणाघात दीपाली यांनी देवेंद्र फडणवीसांवर केला आहे.

शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर राजकीय वातावरण तापल्यामुळे भाजपच्या गोटातून दीपाली यांचा निषेध करण्यात आला. दीपाली यांच्यावर कारवाई करण्याची भाजपची मागणीही जोर धरू लागली आहे. तर दुसरीकडे दीपाली सय्यदही भाजपच्या नेत्यांवर ट्विटरच्या माध्यमातून हल्लाबोल करताना दिसत आहेत.