‘भाजपच्या सर्व नेत्यांनी माफी मागावी’, दिपाली सय्यद यांनी भाजपवर साधला निशाणा

WhatsApp Group

अभिनेत्री आणि शिवसेनाच्या नेत्या दिपाली सय्यद (dipali sayyad ) यांनी शिर्डीत (shirdi) येवून साईबाबांचे दर्शन घेतले. साईदर्शनानंतर दिपाली सय्यद यांनी ‘नुपूर शर्मा (nupur sharma comment on muhammad) यांचे भाष्य हे भारतीय जनता पार्टीने (bjp) केले असून देशातील भाजपच्या सर्व नेत्यांनी माफी मागावी’ अशी टीका करत “कहां गए वो अच्छे दिन” असे म्हणत सय्यद यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. तसंच, उमा खापरे यांना विधान परिषदेची उमेदवारी म्हणजे आपल्यावर केलेल्या टीकांचे बक्षीस आहे, असा टोलाही दीपाली सय्यद यांनी खापरेंना लगावला आहे.

पंकजा मुंडेंना डावलून उमा खापरे यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. कुठं ना कुठे काही तरी असेलच, असा सस्पेस ठेवत त्यांनी उमा खापरे यांचे अभिनंदन केले. खरंतर उमा खापरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले पाहिजेत, उमा खापरे हे नाव याआधी चर्चेत नव्हतं, मात्र मला धमकी दिल्यामुळे त्यांचे तिकीट कन्फर्म झाल्याची खोचक टीका दिपाली सय्यद यांनी यावेळी केली.

पुढे त्या बोलताना म्हणाल्या, नुपूर शर्मा यांना फक्त काढून टाकले म्हणजे सर्व झाले. असे होत नाही. प्रत्येकाला त्याच्या धर्माचा अभिमान आहे. नुपूर शर्मा या भाजपच्या प्रवक्ता होत्या. त्यांचे वक्तव्य ही भाजपची जबाबदारी आहे. त्यांना भाजपने बोलण्याचा अधिकार दिला होता त्यामुळे त्या बोलल्या. भाजपाने नूपूर शर्मा हिला सपोर्ट करायला पाहिजे होते. जातीभेदामुळे कोणाचे भले होणार नाही. त्यामुळे देशातील सर्व भाजप नेत्यांनी माफी मागणे अपेक्षित आहे. असं दीपाली सय्यद यावेळी बोलताना म्हणाल्या.