”मोदिंना खुष करण्याकरीता जिवाच रान करणाऱ्या राजसाहेबांनी…” दीपाली सय्यद यांनी ट्वीट करत राज ठाकरेंवर साधला निशाणा

मुंबई – शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्यांच मत ते मांडतात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मागच्या काही भाषणातून ते भाजपासोबत युती करणार की काय अशी स्थिती निर्माण झाल्याची चर्चा आहे. यामुळे महाविकास आघाडीकडून राज ठाकरेंवर टिका केली जात आहे. यावर आता दीपाली यांनी देखील एक पोस्ट शेअर केली आहे.
दीपाली यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, मोदिंना खुष करीण्याकरीता जिवाच रान करणार्या राजसाहेबांनी आयोध्याच्या दौर्याकरीता मोदींचा सल्ला व मदत घ्यावी. कदाचीत माफीनाम्याची गरज पडणार नाही. असे त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे.
मोदिंना खुष करीण्याकरीता जिवाच रान करणार्या राजसाहेबांनी आयोध्याच्या दौर्याकरीता मोदींचा सल्ला व मदत घ्यावी. कदाचीत माफीनाम्याची गरज पडणार नाही. @mnsadhikrut @RajThackeray @ShivSena @rautsanjay61 @AUThackeray
— Deepali Sayed (@deepalisayed) May 11, 2022
दीपाली आता फक्त अभिनेत्री नाही तर सोबतच त्या राजकारणीही आहेत. विविध मुद्द्यांवर लोकांना जागरुक करण्याचेही कार्य त्या करत असतात. पुरगस्तांची मदत असो किंवा मग मुलींच्या लग्नाची जबाबदारी स्वीकारणं असो असे अनेक कार्यांमध्ये दीपाली यांनी लोकांची मदत केली आहे.