दिल्लीसमोर महाराष्ट्र झुकणार नाही, मोडेल पण वाकणार नाही – दीपाली सय्यद

WhatsApp Group

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या (Shivsena) नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayyad) आणि भाजपमध्ये (BJP) चांगलाच ट्विटर वॉर रंगला आहे. दीपाली सय्यद यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांवर (PM Narendra Modi) आक्षेपार्ह टीका केली होती. त्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले होते. आज पुन्हा एकदा दीपाली सय्यद यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे.

अंगावर आलात तर आम्ही शिंगावर घेऊ, मुख्यमंत्र्या बद्दल बोलाल तर पंतप्रधानांची आठवण करून देऊ. दिल्लीत हुजर्या करणार्यांना महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवुन देऊ. दिल्लीसमोर महाराष्ट्र झुकणार नाही. मोडेल पण वाकणार नाही. जय महाराष्ट्र. असं ट्वीट दीपाली सय्यद यांनी केलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दीपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्यानंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले होते. त्यानंतर दीपाली सय्यद यांच्याविरोधात मुंबईमधील ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दीपाली यांनी ट्विट करत पंतप्रधानांवर जोरदार टीका केली होती. त्यांचं हे ट्विट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं होतं.