तुळशी विवाहापर्यंत दिवाळी असते, त्यामुळे उशीरा का होईना आनंदाचा शिधा घरोघरी पोहोचणार; दीपक केसरकर

WhatsApp Group

आम्ही जखमेवर मलम लावण्याचे काम करतो. आसूड ओढण्याची भाषा आमच्याकडून होतं नाही.  महाविकास आघाडी अडीच वर्षे सत्तेत होते. पण त्यांनी शेतकऱ्यांना मदत केली नाही. शेतकऱ्यांबाबत फक्त बोलायच काम केलं. मात्र त्यांच्यासाठी काहीच केलं नाही. असं विधान शालेय शिक्षण मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे.

दीपक केसरकर कोल्हापूर येथे माध्यमांशी संवाद साधला. मंत्री दीपक केसरकर म्हणाले, राज्यातील जनतेला हे आपलं सरकार असं वाटतंय, त्यामुळे नागरीकांची दिवाळी गोड करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. एका क्लिकवर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमाकरण्याच काम आम्ही केलं. तुळशी विवाहापर्यंत आपली दिवाळी असते, त्यामुळे उशीरा का होईना आनंदाचा शिधा घरोघरी पोहोचणार आहे. असंही ते यावेळी म्हणाले.