Video: दीपक केसरकर जाहीर कार्यक्रमात IAS अधिकाऱ्यावर भडकले

WhatsApp Group

महाराष्ट्रातील पहिल्या डिजिटल शाळेचे उद्घाटन शनिवारी महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील काल्हेरच्या शाळेत करण्यात आले. प्रथम इन्फोटेक फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून डिजिटल साक्षरता अभियानांतर्गत माझी ई-शाला सुरू करण्यात आली. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशात प्रथमच जिल्हा परिषदेमार्फत चालवल्या जाणाऱ्या शाळांमध्ये डिजिटल शिक्षण सुरू करण्यात आले आहे.

यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी कार्यक्रमातच एका आयएस अधिकाऱ्याची चांगलीच खरडपट्टी काढली. दीपक केसरकर यांचे भाषण सुरू असतानाच व्यासपीठावर IAS अधिकारी हे इतर अधिकाऱ्यांसोबत एकमेकांशी जोरजोरात चर्चा करत होते. त्यामुळे मंत्री केसरकर यांनी भाषण करताना व्यत्यय येत असल्याचे पाहून त्यांनी या अधिकाऱ्यांना भाषण थांबवून चांगलेच फैलावर घेतले.