
मुंबई : राज्यात 1.54 लाख कोटींचा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यातील राजकारण पेटले आहे. विरोधक शिंदे सरकारवर हल्ला करत आहेत. तर, दुसरीकडे हा प्रकल्प राज्याबाहेर जाण्यामागे महाविकास आघाडी जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास उद्धव ठाकरेच जबाबदारआहेत असा आरोप शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे.
दीपक केसरकर म्हणाले, मी स्वतः उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले होते, भेटून विनंती केली होती. या प्रोजेक्ट साठी,उद्योगसमूह चेअरमन यांना उद्धव ठाकरे यांची भेट हवी होती. मात्र,उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासाठी वेळ काढला आहे असा आरोपच दीपक केसरकर यांनी केला आहे.
कोणत्याही उद्योगपतीची पहिली पसंती हे आपलं राज्य असतं मात्र महाविकास आघाडी सरकारच्या अस्थिर राजकारणामुळे हा उद्योग गेला. मराठी माणसांच्या नोकऱ्या जाण्यामागे यांचा नाकर्तेपणा जवाबदार आहे असं दीपक केसरकर म्हणाले आहे.