मोती तलावावर फडफडणारा डोमकावळा म्हणजे दीपक केसरकर; सामनातून घणाघात

WhatsApp Group

मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारकडून महाविकास आघाडीतील नेत्यांच्या चौकश्या लावण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर दैनिक सामनातून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. 2024 नंतर सत्ताधाऱ्यांपैकी काहीजण तुरुंगामध्ये असतील असा दावाच सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.दीपक केसरकरांच्या फुटीर गटात किमान 10-12 आमदार असे आहेत की, ते ईडी, सीबीआयच्या भीतीने भाजपसोबत गेले आहेत. तुरुंगात जावं लागेल म्हणून त्यांनी त्यांनी पक्षांतरे केली. मात्र 2024 नंतर हे सगळे तुरुंगात नसतील कशावरून? त्यांच्या जोडीला हा सावंतवाडीचा डोमकावळाही असणार, अशी भविष्यवाणी आम्ही आजच नागपुरामधून करीत आहोत, असं दैनिक सामनाच्या अग्रलेखामध्ये म्हटलं आहे.

सावंतवाडीच्या मोती तलावावर फडफडणारा डोमकावळा म्हणून ख्यातकीर्त असलेले मंत्री दीपक केसरकर यांनी संजय राऊतांचा तुरुंगवास काढला. छान, त्यांना कायद्याचे ज्ञानच नाहीय. या खोके सरकारमध्ये स्वयंभू चाणक्यांची भरमार झाली आहे. जो तो दुसऱ्यांना नैतिकता आणि शहाणपण शिकवण्याच काम करत आहेत.

सावंतवाडीच्या मोती तलावावर फडफडणारा डोमकावळा म्हणजे दीपक केसरकर, असं सांगतानाच या डोमकावळ्याने संजय राऊतांच्या तुरुंगवासावर चुकीच भाष्य केले. त्यांनी राऊत यांची सुटका करताना न्यायालयाने दिलेले खरमरीत निकालपत्र एकदा भिंग लावून वाचायला हवे, असा खोचक सल्लाही अग्रलेखामधून देण्यात आला आहे.

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा