India vs Ireland : Deepak Hoodaचे धडाकेबाज शतक; रोहित शर्मा, केएल राहुल अन् रैनाच्या क्लबमध्ये केला प्रवेश

WhatsApp Group

भारतीय संघाचा नवीन धडाकेबाज फलंदाज दीपक हुडाने (Deepak Hooda) आयर्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात शतकी खेळी केली. अवघ्या सहा आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांचा अनुभव असलेल्या दीपक हुडाने 57 चेंडूत 104 धावा केल्या. त्याने आपल्या या खेळीत 9 चौकार आणि 6 षटकार फटकावले. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी शतक झळकावणारा तो चौथा खेळाडू ठरला.

हुडाने 18व्या षटकातील पहिल्या चेंडूवर एकेरी धाव घेत शतक आपले पूर्ण केले. त्यासाठी तो 55 चेंडू खेळला. शतक पूर्ण करताच तो सुरेश रैना, रोहित शर्मा आणि केएल राहुलनंतर आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात शतक करणारा चौथा फलंदाज ठरला.

दीपक हुडाने संजू सॅमसनसोबत विक्रमी भागीदारी केली. या दोन्ही खेळाडूंनी आयर्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाचं समाचार घेतला. मैदानात जम बसवल्यानंतर विशेषकरुन दिपक हुडाने आक्रमक पवित्रा आजमावत फटकेबाजीला सुरुवात केली. दुसऱ्या बाजूने संजू सॅमसनही त्याला चांगली साथ दिली.दुसऱ्या विकेटसाठी दोघांमध्येही 176 धावांची भागीदारी झाली. या दरम्यान संजू सॅमसनने देखील आंतराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले.

भारतासाठी टी-20मध्ये शतके ठोकणारे खेळाडू

  • रोहित शर्मा – 4 शतक 
  • लोकेश राहुल – 2 शतक 
  • सुरेश रैना – 1 शतक 
  • दीपक हुड्डा – 1 शतक