झिम्बाब्वेविरुद्धच्या विजयानंतर Deepak Hooda बनला टीम इंडियासाठी खास, केला हा अनोखा विश्वविक्रम

WhatsApp Group

दीपक हुडाने पुन्हा एकदा आपल्या अष्टपैलू कामगिरीने संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने बॅट आणि बॉल दोन्हीसह योगदान दिले आणि छाप पाडण्यात यश मिळवले. त्याने हरारे येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 36 चेंडूत 25 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली आणि गोलंदाजीत दोन षटकात सहा धावा देत शॉन विल्यम्सची मोठी विकेट घेतली.

27 वर्षीय या स्टार अष्टपैलू खेळाडूने झपाट्याने संघात स्थान मिळवले आहे. शनिवारी झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात दीपक हुडाने एक अनोखा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा हुड्डा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संघाचा सातत्यपूर्ण भाग आहे. त्याने फेब्रुवारीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मालिकेतून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर त्याच महिन्यात श्रीलंकेविरुद्ध टी-20 मध्ये पदार्पण केले. हुडाच्या विश्वविक्रमाबद्दल बोलायचे झाले तर, पदार्पणापासूनच त्याने खेळलेले सर्व सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. दीपकने पदार्पण केल्यापासून एकूण 16 आंतरराष्ट्रीय सामने (7 वनडे आणि 9 टी-20 ) खेळले आहेत आणि ते सर्व भारताने जिंकले आहेत.

दीपक हुडा प्लेइंग-11 मध्ये असताना भारतीय संघाने सात वनडे आणि नऊ टी-20 सामने जिंकले आहेत. एखाद्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यापासूनची ही सर्वात लांब विजयाची मालिका आहे. दीपक (16 सामने) याने आता या प्रकरणात रोमानियाच्या सात्विक नादिगोटला (15 सामने) याला मागे टाकले आहे. या यादीत समाविष्ट असलेल्या इतर खेळाडूंमध्ये दक्षिण आफ्रिकेचा मधल्या फळीतील फलंदाज डेव्हिड मिलर आणि रोमानियाचा शंतनू वशिष्ठ यांचा समावेश आहे.

दीपक हुडाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

7 एकदिवसीय सामन्यांमध्ये 35 च्या सरासरीने 140 धावा करण्यासोबतच दीपकने तीन विकेट्सही घेतल्या आहेत. टी-20 इंटरनॅशनलबद्दल बोलायचे झाले तर या खेळाडूने 54.80 च्या सरासरीने 274 धावा केल्या आहेत. त्‍याने टी-20 आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍येही शतक झळकावले असून त्‍यामध्‍ये 104 ही त्‍याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.

आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यानंतर सातत्यपूर्ण विजय

  • 16*- दीपक हुडा (भारत)
  • 15- सात्विक नाडीगोतला (रोमानिया)
  • 13- डेव्हिड मिलर (दक्षिण आफ्रिका)
  • 13- शंतनू वरिष्ठ (रोमानिया)
  • 12- के. राजा (वेस्ट इंडिज)