Deepak Chahar Wedding: विवाहबंधनात अडकला दीपक चाहर, जया भराद्वाजसह घेतले सात फेरे

WhatsApp Group

Deepak Chahar Wedding : आयपीएल २०२२ (IPL 2022) नंतर क्रिकेटपटू दीपक चहरचा (Deepak chahar) विवाह सोहळा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने १ जून २०२२ रोजी त्याची मैत्रीण जया भारद्वाजसोबत (jaya Bhardwaj) सात फेरे घेतले. मीडिया रिपोर्ट्सनुसार रात्री १० वाजता विवाहसोहळा पार पडला. यादरम्यान, दीपक चाहरचे वडिल लोकेंद्रसिंह चाहर, काका देशराज चाहर आणि भाऊ राहुल चाहर, बहीण मालती यांनी उपस्थित पाहुण्यांसोबत डान्सही केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepak Chahar (@deepak_chahar9)


सध्या त्यांच्या विवाहाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये दीपक पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केलेली दिसत आहे, त्याच जयाने रॉयल वेडिंग लूक देखील कॅरी केला आहे.दीर्घकाळाच्या रिलेशनशीपनंतर दीपक चाहर आणि त्याची मैत्रीण जया भारद्वाज यांनी १ जून रोजी लग्नगाठ बांधली. फतेहाबाद येथील जेपी पॅलेसमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. यापूर्वी मंगळवारी मेहंदीचा कार्यक्रम आणि संगीत समारंभाचं आयोजन करण्यात आले होते.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rahul Chahar (@rdchahar1)

 

दोनशे ते अडीचशे लोकांच्या उपस्थितीत दोघांचा विवाहसोहळा पार पडला. यानंतर दोघांची ग्रँड रिसेप्शन पार्टी ३ जूनला दिल्लीत देण्यात येणार आहे. यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचे अनेक खेळाडूही सहभागी होतील.