राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरवरून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार आणि पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे शिष्टमंडळ मुंबई पोलीस आयुक्तांना भेटायला गेले. जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ट्विटर हँडलवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ करणार आहे.
शरद पवार यांना मिळालेल्या धमकीची माहिती देताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पवारांसाठी मला व्हॉट्सअॅपवर मेसेज आला होता. एका वेबसाईटच्या माध्यमातून त्यांना धमकी देण्यात आली होती. पोलिसांकडे न्याय मागण्यासाठी आलो आहोत. महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी माझी मागणी आहे. अशी कृत्ये हे घाणेरडे राजकारण असून ते थांबले पाहिजे. असं त्या म्हणाल्या.
आयुष्यभर सुपारी कत्रत खाल्ल्यामुळे औरंगजेबाच तोंड मरताना वाकड होऊन मेल म्हणते हे खरं आहे का? अस असेल तर इतिहास पुनरावृत्ती करणार म्हणजे 😂😜
— SauRabh Pimpalkar (@SrbhBJP) June 8, 2023
भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी गुरुवारी (8 जून) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना औरंगजेबाचा अवतार असल्याचे सांगितले. नीलेश राणे यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, निवडणुका जवळ आल्या की पवारांना मुस्लिम समाजाची काळजी वाटते. कधी कधी वाटतं औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार
निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होतात,
कधी कधी वाटतं औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार. pic.twitter.com/1Rot33Ldct
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 7, 2023
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांचे हे वक्तव्य समोर आल्यानंतर शुक्रवारी (9 जून) राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत जेलभरो आंदोलन पुकारले. दरम्यान, शरद पवार यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या आहेत. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली.