शनिवारी मध्यरात्री मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना धमकीचा फोन आला. आरोपींनी जयपूर पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून धमकी दिली. पोलिसांनी फोन नंबर ट्रेस केला असता तो दौसा कारागृहातील फोन असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तपास यंत्रणांनी तपासासाठी दौसा कारागृह गाठले आणि तेथे शोधमोहीम राबवली. यावेळी कारागृहात सहा मोबाईल सापडल्याने पोलीस अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले.
तपास यंत्रणांनी कारागृहात सापडलेले फोन जप्त केले. ही धमकी तुरुंगातील एका कैद्याने दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले असून त्याचे नाव निमो असून तो दार्जिलिंगचा रहिवासी आहे. जयपूरचे पोलीस आयुक्त बिजू जॉर्ज जोसेफ या प्रकरणाचा तपास करत आहेत.
या वर्षी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना दुसऱ्यांदा धमकी मिळाली आहे. जानेवारी महिन्यातही जयपूर मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याला धमकीचा फोन आला होता. पोलिसांनी कैद्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. मुख्यमंत्र्यांना पुन्हा तुरुंगातून धमकी मिळाली आहे.