मुक्ताईनगर शहरातीमंदिल प्रभाग क्रमांक 12 मधील जिजाऊ नगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 19 मे रोजी सायंकाळच्या सुमारास नवव्या वर्षाची वाढदिवसाची तयारी सुरू असताना कुलरचा शॉक लागल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. वैष्णवी चेतन सनान्से असे मृत लहान मुलीचे नाव आहे.