Queen Elizabeth Died: इंग्लंडची राणी एलिझाबेथ यांचे निधन, वयाच्या 96 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

WhatsApp Group

Queen Elizabeth Died: इंग्लंडची राणी एलिझाबेथ यांचे गुरुवारी निधन झाले आहे. स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल येथे 96 वर्षीय राणीने अखेरचा श्वास घेतला. त्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.

एलिझाबेथ यांचा जन्म 21 एप्रिल 1926 रोजी 17 ब्रॉटन सेंट, लंडन येथे झाला. त्यांचे लग्न नौदल अधिकारी फिलिप माउंटबॅटन यांच्याशी झाले होते. त्यांना चार मुले आहेत – प्रिन्स चार्ल्स, प्रिन्सेस ऍनी, प्रिन्स अँड्र्यू आणि प्रिन्स एडवर्ड. राणीचे पती फिलिप यांचे एप्रिल 2021 मध्ये वयाच्या 99 व्या वर्षी निधन झाले. 1952 मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर एलिझाबेथ सिंहासनावर बसल्या होत्या.

या वर्षी जूनमध्ये ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ यांच्या राजवटीला 70 वर्षे पूर्ण झाली.यानिमित्ताने चार दिवसीय प्लॅटिनम ज्युबिली सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. समारंभाच्या तिसऱ्या दिवशी, प्रिन्स चार्ल्स आणि त्यांचा मुलगा प्रिन्स विल्यम यांनी बकिंगहॅम पॅलेससमोर एका खास मैफिलीत त्यांचा सन्मान केला होता. यावेळी आयोजित पॅलेस समारंभात सुमारे 22,000 लोक पार्टीमध्ये जमले होते, त्यांच्यासमोर डायना रॉस, रॉक बँड क्वीन, डुरान डुरान, एलिसिया कीज आणि इतर कलाकारांनी परफॉर्म केले.