डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे गर्भवती आईसह ९ महीने पूर्ण झालेल्या बाळाचा गर्भातच मृत्यू

WhatsApp Group

यवतमाळ – यवतमाळ Yavatmal येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारमुळे माता व गर्भातील बाळाचा मृत्यू झाला आहे.

अवधूतवाडी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारिवरून मनीष धोटे रा.शारदा नगर यांची पत्नी दुर्गा धोटे यांचा वर्षभरापूर्वी विवाह झाला होता. त्यांतर ती गर्भवती राहिली पहिल्या महिन्यापासून दुर्गाला डॉ. अभय बेलसरे यांच्याकडे उपचारासाठी नेत होते. ९ महीने उपचार केल्यानंतर दुर्गाच्या पाठीत दुखत असल्यामुळे तिला डॉ. अभय बेलसरे यांच्याकडे नेण्यात आले.

दुर्गाची प्रकृती चांगली होती. मात्र एक तास रुग्णालायत बसवून ठेवल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तपासणीसाठी बोलावले. डॉक्टरांनी दिलेल्या इंजेक्शनमुळे दुर्गाची प्रकृती अचानक बिघडली. डॉक्टरांनी त्यांना बाहेरून सोनोग्राफी आणि रक्त तपासणी करुन आणण्यास सांगितले. दुर्गाची सोनोग्राफी आणि रक्त तपासणी करून आणल्यावर डॉक्टर अभय बेलसरे पुढील उपचारासाठी तिला जिल्हा रूग्णालयात हलवा असे सांगितले.

दरम्यान चुकीच्या उपचारमुळे दुर्गाची प्रकृती गंभीर झाली होती. तिला जिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभागात भरती करण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र संध्याकाळच्या दरम्यान दुर्गाची प्राणज्योत मालवली. त्यासोबत ९ महीने पूर्ण झालेल्या गर्भातील बाळाचाही मृत्यू झाला.