
सांगली जिल्ह्यातील खानापूर गावचे सुपुत्र नायब सुभेदार जयसिंग शंकर भगत हे लेह लडाखमध्ये शहीद झाले. लडाखमध्ये झालेल्या हिमस्खलनामध्ये जयसिंग शंकर भगत यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे खानापूर तालुक्यासह सांगली जिल्ह्यामध्ये शोककळा पसरली आहे. आज खानापूर या मूळ गावी जयसिंग भगत यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
जयसिंग भगत हे 22 मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये सुभेदार म्हणून कार्यरत होते. खानापूर-गोरेवाडी मार्गावरील भगतमळा परिसरामधील मातोश्री मंगल कार्यालयसमोरील पटांगणावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
IND Vs NZ 2nd ODI: टीम इंडिया रचणार इतिहास, जागतिक क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडणार ‘ही’ गोष्ट