
मध्य प्रदेशातील कटनी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साईबाबांच्या मंदिरात दर्शनासाठी जात असताना येथे एका भक्ताचा मृत्यू झाला. कटनी येथे साईबाबांचे मोठे मंदिर आहे. साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येथे येतात. अलीकडे डान्स करताना अचानक मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. मात्र मंदिरात दर्शनादरम्यान भाविकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मध्यप्रदेशच्या कटनी येथे राहणारे राकेश मेहानी यांचा मंदिरात साईबाबांच्या दर्शनासाठी जात असताना मृत्यू झाला होता. त्यांची साईबाबांवर अतूट श्रद्धा होती. साईबाबांच्या मंदिरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंदिरात दर्शन घेत असताना झालेल्या मृत्यूने लोकांना धक्का बसला आहे.
राकेश मेहानी यांनी साईबाबांच्या मंदिरात भक्तीभावाने नतमस्तक केल्यावर त्याला पुन्हा उठता आले नाही, असे सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये दिसत आहे की, डोके टेकवूनही तो बराच वेळ उठला नाही तेव्हा मंदिराचा पुजारी त्याच्यापर्यंत पोहोचला आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत राकेश मेहानीने प्राणाची आहुती दिली होती.
View this post on Instagram
राकेश मेहानी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राकेशच्या मृत्यूनंतर मंदिर प्रशासनाने त्याच्या कुटुंबीयांना माहिती देऊन मृतदेह ताब्यात दिला.