वसतिगृहात मुलाचा मृत्यू; थरकाप उडवणारा व्हिडिओ होतोय व्हायरल

0
WhatsApp Group

तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये झालेल्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका हॉस्टेलचा असल्याचं सांगण्यात येत आहे, ज्यामध्ये 25 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाचा मृत्यू झाला. शेख अकमल सुफुयान असे या अभियंत्याचे नाव आहे. सुफुयान किराणा सामान घेऊन परतत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. त्याच्या वसतिगृहात प्रवेश करताच तो एका उघड्या चौकोनी आकाराच्या पाण्याच्या टँकरमध्ये पडतो. तेवढ्यात तळमजल्यावरील फ्लॅटमधून एक पुरुष, महिला आणि दोन मुले बाहेर येतात.

अकमलला पकडण्यासाठी या लोकांनी पाण्याच्या टँकरमध्ये पाईप टाकले. मात्र त्यांना प्रतिसाद मिळत नाही. रायदुर्ग पोलिसांनी वसतिगृह मालकावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. टँकरवर झाकण असते तर तरुणाचा जीव वाचला असता. हैदराबादमध्ये यापूर्वीही असे अनेक अपघात झाले आहेत.