Dhule Crime : महाराष्ट्रातील धुळे शहरातील प्रमोद नगर परिसरात एका घरात 4 जणांचे मृतदेह सापडले आहेत. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. कृषी खत विक्रेते प्रवीण मानसिंग गिरासे, त्यांची पत्नी गीता प्रवीण गिरासे या शिक्षिका आणि त्यांची दोन मुले मितेश प्रवीण गिरासे आणि सोहम प्रवीण गिरासे अशी मृतांची नावे आहेत.
Related Posts
प्रवीण गिरासे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे, तर पत्नी व दोन मुलांचा विषारी द्रव्य प्राशन करून मृत्यू झाला आहे. कुटुंबीयांनी हे पाऊल का उचलले याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.