DC vs MI : टीम डेव्हिडच्या षटकाराने चाहता झाला जखमी, तोडांवर आदळला चेंडू

0
WhatsApp Group

DC vs MI: आयपीएल 2024 चा 43 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. जिथे मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्स संघाने 20 षटकात 4 गडी गमावून 257 धावा केल्या. संघाकडून जेक फ्रेझर-मॅकगर्कने 84 आणि ट्रिस्टन स्टब्सने 47 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्स संघाने हा सामना 10 धावांनी जिंकला आहे. मुंबई इंडियन्स संघाने 20 षटकात 9 गडी गमावून 247 धावा केल्या. सामन्यादरम्यान मुंबईचा स्टार खेळाडू टीम डेव्हिडने जबरदस्त फटकेबाजी केली. या फटकेबाजीच्या दरम्यान त्याने एक असा षटकार मारला, ज्यामुळे स्टँडमध्ये बसलेल्या एका चाहत्याला दुखापत झाली. ज्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

टीम डेव्हिडने शॉट खेळताच स्टँडवर बसलेले चाहते चेंडू पकडण्याचा प्रयत्न करत होते, मात्र गर्दीत चेंडू एका चाहत्याच्या चेहऱ्यावर आदळला. त्यानंतर त्याला तातडीने वैद्यकीय कक्षात नेण्यात आले. क्रिकेटच्या मैदानावर अशा घटना अनेकदा पाहायला मिळतात. या सामन्यातही असेच काहीसे घडले. चाहत्याच्या स्थितीबाबत अद्याप कोणतेही अपडेट देण्यात आलेले नाही. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या 258 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सला 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 247 धावा करता आल्या. मुंबईसाठी युवा फलंदाज तिलक वर्माने सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने 32 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 63 धावा केल्या. इशान किशन 20, रोहित शर्मा 8, सूर्यकुमार यादव 26, हार्दिक पांड्या 46, नेहल वडेरा 4, टीम डेव्हिड 37, मोहम्मद नबी 7, पियुष चावला 10 धावांवर बाद झाले. अखेरीस ल्यूक वुड 9 धावांवर नाबाद परतला. अशाप्रकारे मुंबई संघाने 9 विकेट गमावून 247 धावा केल्या.