दाऊदने केलं दुसरं लग्न; बहीण हसीनाच्या मुलाने सांगितलं – दुसरी पत्नी पाकिस्तानी पठाण

WhatsApp Group

मोस्ट वाँटेड दहशतवादी दाऊद इब्राहिमने पाकिस्तानात दुसरे लग्न आहे. दाऊदची बहीण हसिना पारकरचा मुलगा अली शाह याने राष्ट्रीय तपास यंत्रणेसमोर (एनआयए) हा खुलासा केला आहे. अलीने एजन्सीला सांगितले की दाऊदने अद्याप त्याची पहिली पत्नी मेहजबीनला घटस्फोट दिलेला नाही आणि तो सध्या कराचीमध्ये राहत आहे.

अलीने सप्टेंबर 2022 मध्ये एनआयएसमोर हे वक्तव्य केले होते. यानंतर एनआयएने अनेक ठिकाणी छापे टाकून दाऊदच्या नेटवर्कशी संबंधित अनेकांना अटक केली. यानंतर एजन्सीने कोर्टात आरोपपत्रही सादर केले.