दाऊदचा भारतात घातपाताचा कट

WhatsApp Group

मुंबई – कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम Dawood Ibrahim पुन्हा सक्रीय झाल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. दाऊद पुन्हा एकदा मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये मोठा घातपात घडवण्याचा कट रचत आहेत. दाऊदने यासाठी एक स्पेशल युनिट तयार केले आहे. असा गौप्यस्फोट करण्यात आला आहे.

डॉन दाऊद इब्राहीम याने या स्पेशल युनिटद्वारे देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये हिंसा घडवून आणण्याचा कट रचला आहे, अशी माहिती समोर आली आहे. . दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये राहणारे काही मोठे नेते आणि व्यावसायिक दाऊद इब्राहीमच्या निशाण्यावर आहेत.

अलिकडेच दाऊद इब्राहीम याच्याशी संबंधित विविध प्रकरणांचा तपास एनआयएने आपल्या हाती घेतला आहे.
विविध तपास यंत्रणा सध्या पुन्हा एकदा दाऊद गँगच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेऊन आहेत. देशात अनेक शहरांमध्ये दंगली घडवण्यासाठी आपल्या गँगमध्ये काही जणांना दाऊदने भरती केले आहे. धार्मिक तेढ निर्माण करून हिंसाचार घडवण्याचा कट आहे. अशी माहिती समोर आली आहे.