बापरे इतका राग! अंपायरच्या निर्णयावर डेव्हिड वॉर्नर चिडला, आदळली बॅट मग…

WhatsApp Group

ऑस्ट्रेलियाने भलेही श्रीलंकेविरुद्ध पहिला विजय नोंदवला असेल पण संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. वॉर्नरच्या सततच्या फ्लॉपमुळे कांगारू संघाच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. श्रीलंकेविरुद्ध, वॉर्नर 11 धावा करून बाद झाला, त्याला श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मधुशंकाने एलबीडब्ल्यू केले. मात्र, डेव्हिड वॉर्नरला अंपायरचा हा निर्णय योग्य वाटला नाही आणि तो यावर आपला संयम गमावताना दिसला. ज्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे ज्यामध्ये तो शिवीगाळ करताना दिसत आहे.

पंचांच्या निर्णयावर वॉर्नर नाराज

या सामन्यात वॉर्नरला मैदानी पंचांनी एलबीडब्ल्यू आऊट केले, त्यानंतर वॉर्नरने डीआरएस घेतला आणि तिसर्‍या पंचानेही त्याला मैदानी पंचांच्या कॉलवर आऊट घोषित केले. अंपायरच्या या निर्णयाचा वॉर्नरला इतका राग आला की सुरुवातीला त्याने आपली बॅट जोरात आपटली. व्हिडिओमध्ये वॉर्नरही शिवीगाळ करत असल्याचे दिसत आहे. वॉर्नर इथेच थांबला नाही, त्याने ड्रेसिंग रूममध्ये जाऊन बॅटही फेकली. आता वॉर्नरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत असून यूजर्सही या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

ऑस्ट्रेलिया 5 विकेट्सने जिंकला

ऑस्ट्रेलियाने हा सामना 5 विकेटने जिंकला आहे. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाचा हा पहिला विजय आणि श्रीलंकेचा सलग तिसरा पराभव आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ 43.3 षटकात 209 धावांवर बाद झाला. त्यानंतर श्रीलंकेकडून फलंदाजी करताना पथुम निशांकाने 61 धावांची तर परेराने 78 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने 35.2 षटकात 5 विकेट्स गमावून विजय मिळवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना अॅडम झाम्पाने 8 षटकात 47 धावा देत 4 बळी घेतले.

Sunny Leone दिसली जबरदस्त लूकमध्ये, पहा फोटो

ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 210 धावांचे लक्ष्य होते. ऑस्ट्रेलियाने 35.2 षटकात 5 विकेट गमावत 215 धावा करत सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाकडून जोश इंग्लिशने सर्वाधिक धावा केल्या. जोश इंग्लिशने 59 चेंडूत 58 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 1 षटकार लगावला.

ICC World Cup 2023: चित्यासारखी झेप… डेव्हिड वॉर्नरने घेतले अप्रतिम झेल; पहा VIDEO

त्याचवेळी सलामीवीर मिचेल मार्शने 51 चेंडूत 52 धावांचे योगदान दिले. याशिवाय मार्नस लॅबुशेनने 60 चेंडूत 40 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 2 चौकार मारले. ग्लेन मॅक्सवेल 21 चेंडूत 31 धावा करून नाबाद परतला. तर मार्कस स्टॉइनिसने 10 चेंडूत 20 धावा करून नाबाद राहिला.