वॉर्नरने ‘पुष्पा’ची हुक स्टेप केली कॉपी, वॉर्नरचा व्हिडीओ पाहून अल्लू अर्जुनने केली खास कमेंट

WhatsApp Group

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटर डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतो. वॉर्नरचे इंस्टाग्राम हँडल डान्स क्लिप आणि मजेदार व्हिडिओंनी भरलेले असते. वॉर्नरला बॉलीवूड आणि टॉलीवूड चित्रपटांमध्ये खूप रस आहे आणि तो अनेकदा या चित्रपटातील गाण्यांवर व्हिडीओ बनवत असतो.

वॉर्नरने नुकताच त्याच्या इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो श्रीवल्ली गाण्यावर अल्लू अर्जुनच्या हुक स्टेप्स करताना दिसत आहे. त्यामुळे आता वॉर्नरही पुष्पा चित्रपटाचा फॅन झाला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या व्हिडीओ क्लिपमध्ये तो अल्लू अर्जुनप्रमाणे डान्स करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by David Warner (@davidwarner31)


वॉर्नरच्या व्हिडिओला तासाभरात नऊ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. इंस्टाग्राम वापरकर्त्यांना हा व्हिडिओ खूप आवडला असून अनेकांनी या व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव केला. विशेष म्हणजे ‘पुष्पा’ चा हिरो असलेल्या अल्लू अर्जुनही वॉर्नरच्या या व्हिडिओवर खास कमेंट केली आहे.