David Warner: डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16000 धावा केल्या पूर्ण

WhatsApp Group

David Warner: ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचे श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात (श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय) शतक एका धावेने हुकले, मात्र तरीही त्याने आपल्या नावावर एक मोठी कामगिरी नोंदवली आहे. वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16000 धावा पूर्ण केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नरने या सामन्यामध्ये 62 धावा करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16000 धावा पूर्ण केल्या आहेत. या सामन्यापूर्वी वॉर्नरच्या नावावर 15 हजार 938 धावा होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16000 धावा पूर्ण करणारा वॉर्नर ऑस्ट्रेलियाचा तो सहावा फलंदाज ठरला आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या एकदिवसीय सामन्यात डेव्हिड वॉर्नरने 99 धावा केल्या. यादरम्यान त्याने 112 चेंडूत 12 चौकार मारले. अवघ्या एका धावेने शतक हुकलेल्या वॉर्नरला यष्टिरक्षक निरोशन डिकवेलाने धनंजय डी सिल्वाने त्याला बाद केले.

ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा विक्रम माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या नावावर आहे. ज्याने 559 सामन्यांमध्ये 27 हजार 368 धावा केल्या आहेत. त्यानंतर या यादीमध्ये स्टीव्ह वॉ (18 हजार 496), अॅलन बॉर्डर (17 हजार 698), मायकेल क्लार्क (17 हजार 112) आणि मार्क वॉ (16 हजार 529) यांचा समावेश आहे.