David Warner Retirement: ऑस्ट्रेलियाला वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठा धक्का, डेव्हिड वॉर्नरची कसोटी-वनडेमधून निवृत्तीची घोषणा

WhatsApp Group

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने सिडनी कसोटीपूर्वी एक धक्कादायक घोषणा केली आहे. कसोटीनंतर त्याने आता एकदिवसीय क्रिकेटलाही अलविदा केला आहे. 3 जानेवारीपासून सुरू होणारी सिडनी कसोटी ही त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना ठरणार आहे.

ऑस्ट्रेलियाला सिडनीमध्ये 3 जानेवारीपासून पाकिस्तानसोबत तिसरा कसोटी सामना खेळायचा आहे. ही टेस्ट डेव्हिड वॉर्नरची शेवटची टेस्ट मॅच असणार आहे. पण, याआधी वॉर्नरने त्याच्या चाहत्यांना आणखी एक मोठा धक्का दिला असून त्याने वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणाही केली आहे. परंतु जर त्याच्या संघाला त्याची गरज असेल तर तो त्या स्पर्धेत संघाचा भाग होऊ शकतो.

डेव्हिड वॉर्नरचा वनडे रेकॉर्ड

डेव्हिड वॉर्नरने 2009 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. वॉर्नरने ऑस्ट्रेलियासाठी 161 सामने खेळले असून त्यात त्याच्या नावावर 6932 धावा आहेत. या कालावधीत त्याने 22 शतके आणि 33 अर्धशतके केली आहेत. डेव्हिड वॉर्नरची वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी 179 धावांची आहे. वॉर्नरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. याशिवाय त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिले वनडे अर्धशतकही झळकावले. आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये डेव्हिड वॉर्नरची जागा शोधणे ऑस्ट्रेलियन संघासाठी सोपे नसेल.