सासूला बेदम मारहाण करत सुनेने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली मिरची

WhatsApp Group

बाडमेर- राजस्थानमधील बाडमेरमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. सिंदरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कमठाई येथील एक महिला आपल्या सुनेला घेण्यासाठी तिच्या माहेरी गेली होती. यादरम्यान सुनेला घेण्यासाठी गेलेल्या महिलेवर हल्ला करण्यात आला. इतकेच नाही तर पीडित महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची घातल्याचा आरोप महिलेने केला आहे. आता या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सोशलवर प्रचंड व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांनाही ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी पीडितेचे मेडिकलही केले आहे.

पोलिसांचे म्हणणे आहे की, एक महिला आपल्या मुलाच्या सुनेला घेण्यासाठी तिच्या माहेरी सिंदरी कमठाई येथे गेली होती. यादरम्यान मुलाच्या सासरच्या काही महिलांशी तिचावाद झाला. त्यानंतर सासरच्या दोन महिलांनी पीडितेला मारहाण केली. त्यानंतर त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची टाकली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनवला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तसेच हा व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचला. याप्रकरणी आता पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे. हा व्हिडिओ आठवडाभर जुना असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.