Dasara Wishes In Marathi 2023 – दसऱ्याच्या शुभेच्छा मराठीमध्ये

WhatsApp Group

भारतात दसरा हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी ठिकठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. दसऱ्याच्या आनंदाच्या निमित्ताने लोक एक-दोन आठवडे आधीच एकमेकांना अभिनंदनाचे मेसेज पाठवू लागतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या प्रियजनांना दसऱ्याचे सुंदर संदेश पाठवायचे असतील Dasara Message in Marathi या लेखातील दिलेले मेसेज पाठवू शकता.

आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
दसरा सणानिमित्त आपणास व
आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!☘️

श्रीरामाचा आदर्श घेऊन
रावणरूपी अहंकाराचा
नाश करत
दसरा साजरा करूया..
☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!☘️

उत्सव आला विजयाचा,
दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची..
☘️विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!☘️

पहाट झाली दिवस उजाडला,
आला आला सण दसऱ्याचा आला,
अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,
उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं..
आपणास व आपल्या परिवारास
☘️विजयादशमी दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा !☘️

तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची..
विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

दसरा!
या दिवशी म्हणे सोनं वाटतात..
एवढा मी श्रीमंत नाही,
पण नशिबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली..
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न..
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच..
सदैव असेच रहा..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे..
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा..
केवळ सोन्यासारख्या लोकांना..
हॅप्पी दसरा!

आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार,
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार,
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार,
तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून
विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा..!
तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे,
भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो..
Happy Dasara..!

रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी,
सजली दारी तोरणे ही साजिरी,
उमलतो आनंद मनी, जल्लोष विजयाचा हसरा,
उत्सव प्रेमाचा, मुहूर्त सोनेरी हा दसरा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!

विजय झाला अज्ञानावर ज्ञानाचा, द्वेषावर प्रेमाचा,
दसरा उत्सव आहे श्रीरामांच्या पराक्रमाचा..!
तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
🙏शुभ दसरा✨

सांगता नवरात्राची,
जल्लोष विजयाचा..
मुहूर्त एक
सण दसऱ्याचा..
☘️☘️Happy Dasara..!☘️☘️

आपट्याच्या पानांची
होते देवाणघेवाण..
प्रेमाचा ओलावा
करुनि दान..
शुभ दसरा..!

वैर जुने विसरा,
आला उत्सव दसरा..
भेटा प्रेमाने शत्रूला,
ठेवा चेहरा हसरा..!

सीमा ओलांडून आव्हानांच्या
गाठू शिखर यशाचे!
प्रगतीचे सोने लुटून!
सर्वांमध्ये हे वाटायचे!!
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!!☘️

दिन आला सोनियाचा
भासे घरा ही सोनेरी
फुलो जीवन आपुले
येवो सोन्याची झळाळी
☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!☘️

लाखो किरणी उजळल्या दिशा,
घेऊनी नवी उमेद, नवी आशा,
होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा
☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!☘️

जाळूनी रावणरुपी अन्याय, अहंकार भेदभाव
सोने लुटूया प्रगत विचारांचे..
करुन सिमोल्लंघन,
साधूया लक्ष विकासाचे…
आपणा सर्वांना दसरा आणि
☘️विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!☘️

दिन आला सोनियाचा,
भासे धरा ही सोनेरी,
फुलो जीवन आपुले,
येवो सोन्याची झळाळी,
☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!☘️

वाईटावर चांगल्याची मात
महत्व या दिनाचे असे खास
जाळोनिया द्वेष- मत्सराची कात
मनोमनी वसवी प्रेमाची आस
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!☘️

झाली असेल चूक तरी
या निमिनत्ताने आता ती विसरा
वाटून प्रेम एकमेकांस
साजरा करु यंदाचा हा दसरा! दसऱ्याच्या शुभेच्छा.☘️

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा, तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर देखील फॉलो करा. Insidemarathi.com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या
INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा